Shinde & Thackeray Sarkar: सत्ता संघर्षाचा निकाल लागला, उद्धव ठाकरेंनी ही चूक केली नसती तर आज ते पुन्हा मुख्यमंत्री झाले असते, राज्यपालाचे सर्व निर्णय चुकले

Shinde & Thackeray Sarkar: सत्ता संघर्षाचा निकाल लागला, उद्धव ठाकरेंनी ही चूक केली नसती तर आज ते पुन्हा मुख्यमंत्री झाले असते, राज्यपालाचे सर्व निर्णय चुकलेमित्रांनो अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल आज माननीय सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाने हा निकाल देत असताना महत्त्वाच्या गोष्टींवर टिप्पणी केलेली असून राज्याच्या सत्ता संघर्ष दरम्यान राज्यपालाची भूमिका ही चुकीची होती, तसेच जर आज उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवता आले असते, Suprime Court चे या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झालेली असून उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने ही एक चिंतेची बाब आहे. 

 

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल माननीय सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतला होता त्यानंतर तो निकाल राखीव ठेवला होता. सर्व देशाच्या दृष्टीने तसेच भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा मानला जाणारा हा Maharashtra Political Cricies महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी वरील सत्ता संघर्ष चा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला आहे.

राज्यातील सर्व जनतेचे लक्ष शिंदे व ठाकरे गटाच्या सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षाच्या याचिकेवर लागले होते. आता हे निकाल जाहीर झालेला असून त्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे Suprime Court ने उपस्थित केले ते आपण जाणून घेऊया.

 

उद्धव ठाकरेंनी हे केले नसते तर ते आज पुन्हा मुख्यमंत्री असते

Uddhav Thackarey यांनी राज्याचा सत्ता संघर्ष घडत असताना राज्यपालांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या बहुमत चाचणीनंतर बहुमतांना सामोरे न जाता स्वतः राजीनामा दिला होता. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर कोसळले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांनी दिलेला राजीनामा अडचणीत आणत असून जर त्यांनी हा राजीनामा त्यावेळेस दिला नसता आणि बहुमत चाचणीला सामोरे केले असते, तर आज ते पुन्हा मुख्यमंत्री झाले असते असे महत्त्वाचे निरीक्षण तसेच माहिती आज सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे.

 

सुप्रीम कोर्टाचे खालील बाबींवर ताशेरे Suprim Court On Maharashtra Political Cricies:

माननीय सुप्रीम कोर्टाने राज्यपालांनी सकाळ संघर्षाच्या काळात घेतलेले भूमिका चुकीची ठरवलेली असून राज्यपालांनी त्यावेळेस घेतलेली सर्व निर्णय चुकीची असल्याची माहिती सुप्रीम कोर्टाने दिली. त्याचबरोबर भरत गोगावले यांची करण्यात आलेली नियुक्ती तसेच व्हीपचा मुद्द्यावरून ताशेरे ओढले आहे.

 

हे नक्की वाचा: पतीच्या संपत्तीवर पत्नीचा किती अधिकार असतो? जर पतीने हे काम केले तर, पत्नीला संपत्ती मिळणार नाही, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

16 आमदाराच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष यांच्या कडे:

सुप्रीम कोर्टात असलेल्या 16 आमदाराचा प्रश्न आता निघाली निघणार असून सुप्रीम कोर्टाने राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे 16 आमदाराच्या अपत्रतेचा निर्णय सोपवला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Leave a Comment