राज्यातील शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना अनुदानावर कडबा कुट्टी मशीनचे वाटप करण्यात येत असते. शेतकऱ्यांकडून वारंवार कडबा कुट्टी कशी मिळवायची? कडबा कुट्टी करिता अर्ज कसा करायचा? कडबा कुट्टी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान तसेच कडबा कुट्टी चे प्रकार या संदर्भात वारंवार प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जनावरांना योग्य व बारीक केलेला चारा उपलब्ध व्हावा यासाठी कडबा कुट्टी मशीन चे वाटप करण्यात येते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कडबा कुट्टी मशीन अतिशय महत्त्वाचे असून या Kadba Kutti Anudan Yojana योजने संदर्भात विस्तृत माहिती खाली दिलेली आहे.
कडबा कुट्टी मशीन चे प्रकार किती? Types of Kadba Kutti
कडबा कुट्टी मशीन ही खालील दोन प्रकारची असते.
1. मनुष्य चलीत कडबा कुट्टी
2. ट्रॅक्टर चलीत इलेक्ट्रिक कडबा कुट्टी
वरील दोन प्रकार कडबा कुट्टी मशीनचे आहेत.
कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान किती? Kadba Kutti Yojana Anudan
कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळते. कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत मनुष्यचलित कडबा कुट्टी ची किंमत ही कमी असते. परंतु ट्रॅक्टर वर चालणारा इलेक्ट्रिक कडबा कुट्टी ची किंमत जास्त असते. जर तुम्ही कडबा कुट्टी वीस हजार रुपयाला खरेदी केली तर तुम्हाला जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान मिळते. जर तुम्ही आठ हजार रुपयाला कडबा कुट्टी खरेदी केली तर तुम्हाला जास्तीत जास्त चार हजार रुपये पर्यंत अनुदान मिळते. म्हणजेच 50 टक्के अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळते.
जर तुम्ही ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी खरेदी केली तर तुम्हाला 50% अनुदान किंवा जास्तीत जास्त 20 हजार रुपये अनुदान मिळते. जर तुम्ही ट्रॅक्टर चलित कडबा कुट्टी 40 हजार रुपयांची कडबा कुट्टी खरेदी केली तर तुम्हाला वीस हजार रुपये अनुदान मिळते. आणि जर तुम्ही ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी 25000 ची खरेदी केली तर तुम्हाला 12500 म्हणजेच 50 टक्के अनुदान मिळते.
कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज कसा करायचा? How to Apply For Kadba Kutti Yojana?
तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.
1. कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर जायचं आहे.
2. जर तुम्ही यापूर्वी शेतकरी म्हणून नोंदणी केलेली नसेल तर सर्वात पहिल्यांदा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
3. आता तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून किंवा आधार कार्ड ओटीपी च्या माध्यमातून लॉगिन करायचं आहे.
4. आता या वेबसाईट मध्ये लॉगिन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला अर्ज करा नावाचा ऑप्शन दिसेल.
5. त्या अर्ज करा नावाचे ऑप्शन वर क्लिक करून तुमच्या समोर आता विविध प्रकारच्या योजना दिसत असेल. कडबा कुट्टी चा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
6. आता कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज ओपन झालेला आहे, त्यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
7. त्यानंतर तुम्हाला कडबा कुट्टी नावाचा ऑप्शन निवडायचा आहे.
8. जर तुम्हाला ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी पाहिजे असेल तर ट्रॅक्टरचलित अवजारे या ऑप्शन मधून कडबा कुट्टी योजना निवडा. ट्रॅक्टर चलित कुट्टी योजनेसाठी तुमच्याकडे ट्रॅक्टर असायला हवा.
9. त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज जतन करायचा आहे. आता पुन्हा या वेबसाईटवर येऊन तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवर कडबा कुट्टी योजनेसाठी निवड झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल क्लिक करून तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
10. अर्ज करण्यासाठी अर्ज चे पेमेंट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर अर्ज सबमिट झाल्याचा तसेच पेमेंटचा एसएमएस प्राप्त होईल.
अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया
वरील प्रकारे तुम्ही कडबा कुट्टी योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर आता तुमचा अर्ज छाननीअंतर्गत या ऑप्शन मध्ये दिसेल. महाडीबीटी शेतकरी योजनांची लॉटरी लागल्यानंतर जर तुमची निवड झाली तर तुम्हाला कडबा कुट्टी योजनेअंतर्गत निवड झाल्याचे एसएमएस प्राप्त होईल. त्यानंतर तुम्हाला पूर्व संमती पत्र देण्यात येईल त्यानंतर तुम्ही आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची आहे. त्यानंतर योजनेची अंतर्गत कडबा कुट्टी मशीन ची खरेदी करून अनुदान मागणी करावी लागेल.