मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तर्फे समाज कल्याण हॉस्टेल करिता नवीन अर्ज सुरू झालेले आहे. समाज कल्याण हॉस्टेल 2022 अर्ज सुरू झाले आहेत. त्यामुळेच या पोस्टमध्ये आपण समाज कल्याण हॉस्टेल करिता अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच लागणारी कागदपत्रे, पात्रता, त्याचप्रमाणे कोणते विद्यार्थी समाज कल्याण हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळवू शकतात या विषयी संपूर्ण माहिती साठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. Samaj Kalyan Hostel application 2022 , Samaj Kalyan Hostel application 2022 Maharashtra. समाज कल्याण शासकीय वसतिगृह महाराष्ट्रsamaj kalyan hostel admission form online 2022-23
समाज कल्याण हॉस्टेल 2022 अर्ज सुरू | Samaj Kalyan Hostel application 2022 |
समाज कल्याण हॉस्टेल अर्ज करण्याची प्रक्रिया Samaj Kalyan Hostel 2022 Application Process in Marathi:-
समाज कल्याण हॉस्टेल म्हणजेच Government Hostel 2022 करिता अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. गवर्नमेंट हॉस्टेल करिता अर्ज करण्याची प्रक्रिया ही 2022 करिता ऑफलाईन पद्धतीने सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण हॉस्टेल मध्ये अर्ज करायचा असेल त्यांना संबंधित हॉस्टेल मध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. त्यामुळे पात्र सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करून घ्यावे.
शासकीय वसतिगृह बद्दल महत्वपूर्ण असे वारंवार पडणारे प्रश्न:-
समाज कल्याण हॉस्टेल योजना अर्ज कुठे मिळेल:-
समाज कल्याण हॉस्टेल चा अर्ज तुम्हाला ज्या हॉस्टेल मध्ये अर्ज करायचा आहे, त्या वसतिगृहात मिळणार आहे.
समाज कल्याण हॉस्टेल योजना अर्ज आँनलाईन / ऑफलाईन:-
ऑफलाईन
समाज कल्याण हॉस्टेल योजना प्रवेश प्रक्रिया:-
अर्ज केल्या नंतर लिस्ट लागत असते, जर त्या लिस्ट मध्ये तुमचे नाव आल्यास कागदपत्रे हॉस्टेल मध्ये देऊन एडमिशन करून घ्यावी. त्या नंतर प्रवेश निश्चित होईल.
समाज कल्याण हॉस्टेल एकूण किती लिस्ट लागतात?:-
समाज कल्याण हॉस्टेल मध्ये सहसा तीन लिस्ट लागत असतात.
हे नक्की वाचा:- राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना
समाज कल्याण हॉस्टेल मध्ये प्रवेश कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतो Which students get admission in Samaj kalyan Hostel:-
Samaj kalyan विभागाच्या Government hostel मध्ये प्रवेश हा, शालेय विभाग म्हणजे 8 वी ते 10 वी तसेच कनिष्ठ महाविद्यालय वर्ग 11 वा. आणि वरिष्ठ महाविद्यालय बी ए, बी. कॉम, बी एस सी इत्यादी तसेच वरिष्ठ महाविद्यालय व्यवसायिक विभाग कृषी , डी फॉर्म, बी फॉर्म इत्यादी. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळविता येतो. समाज कल्याण शासकीय वसतिगृह महाराष्ट्र
समाज कल्याण हॉस्टेल (government hostel maharashtra) मध्ये प्रवेश हा SC,ST,OBC तसेच VJ आणि NT-A, NT-B, NT-C, NT-D या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या Government Hostel मध्ये प्रवेश मिळविता येत असतो.
समाज कल्याण हॉस्टेल मध्ये अपंग तसेच अनाथ विद्यार्थ्यांना त्यांच्या करिता स्पेशल जागा राखीव असतात. Shaskiya Hostel Yojana Maharashtra
समाज कल्याण हॉस्टेल मध्ये प्रवेश मिळविण्याकरिता किती टक्के असावे लागतात? What is the percentage required to get admission in Social Welfare Hostel? :-
समाज कल्याण विभाग च्या Government Hostel मध्ये प्रवेश घेण्यासाठी टक्केवारी किती पाहिजे, हा एक महत्वपूर्ण असा विषय आहे. समाज कल्याण विभाग वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी तुमच्या जात प्रवर्ग नुसार टक्केवारी असावी लागते.
जर अर्जदार हा एससी प्रवर्गातील असेल तर त्यांना 60 टक्के किंवा त्या पेक्षा जास्त टक्के असावे लागते. जर अर्जदार हा ओबीसी किंवा VJ या प्रवर्गातील असेल तर त्यांना 80 पेक्षा जास्त टक्के असावे लागते.
वर दर्शविलेली टक्केवारी कमी जास्त प्रमाणात होऊ शकतात. कारण की जर जास्त अर्ज प्राप्त झाले नाही तर कमी टक्के असले तरी सुद्धा तुमचा नंबर लागतो.
समाज कल्याण हॉस्टेल Government Hostel Maharashtra आवश्यक कागदपत्रे Samaj Kalyan Hostel Government Hostel Maharashtra Required Documents :-
1. मार्कशीट
2. टीसी
3. जातीचा दाखला
4. उत्पन्न दाखला
5. आधार कार्ड
6. बँक पासबुक
7. अधिवास प्रमाणपत्र
8. गॅप सर्टिफिकेट( जर शिक्षणात खंड पडल्यास )
9. अपंग प्रमाणपत्र ( जर असल्यास)
10. चरित्र प्रमाणपत्र ( सरपंच किंवा पोलिस पाटील यांच्या स्वाक्षरीने)
समाज कल्याण शासकीय वसतिगृहात मिळणाऱ्या सुविधा Facilities available in Samaj Kalyan Government Hostel :-
🛑आकर्षक इमारत
🛑राहण्याची उत्तम व्यवस्था
🛑प्रवेशित विद्यार्था करीता मोफत व सकस आहारा सहीत जेवणची व्यवस्था
🛑मोफत सर्व शैक्षणिक स्टेशनरी साहीत्य
🛑दरमहा निर्वाह भत्ता
🛑स्पर्धा परीक्षा पुस्तके
🛑ग्रंथालयीन पुस्तके
🛑बेड बिछाना साहीत्य
🛑मनोरंजनाची सुविधा
🛑अभ्यासिका
🛑क्रिडा साहीत्य (सर्व प्रकारचे ) व व्यायाम साहीत्य (जिम)
जर तुम्हाला ही शासकीय वसतिगृह विषयक माहिती महत्वपूर्ण वाटत असल्यास तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला. जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करू शकतात.