Mht Cet ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? MHT CET 2022 Registration

 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अंतर्गत घेण्यात येणार आहे mht cet 2022 चे अर्ज हे सुरू झालेले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम एच टी सी इ टी ही परीक्षा द्यावी लागत असते. व्यवसायिक शिक्षणामध्ये एग्रीकल्चर इंजिनीरिंग फार्मसी अशा शिक्षणासाठी राज्य सामायिक परीक्षा अंतर्गत mht cet ही घेण्यात येत आहेत.

Mht Cet ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? MHT CET 2022 Registration
Mht Cet ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? MHT CET 2022 Registration

 

आजच्या या लेखामध्ये आपण MHT CET 2022 साठी अर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी mht cet ही द्यावी लागते.

हे नक्की वाचा:- mht cet 2022 अटी व शर्ती

हा MHT CET 2022-23 चा अर्ज हा 10 फेब्रुवारी ते 31 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

MHT CET 2022 ऑनलाईन अर्ज कसा करावा ? ( How to apply for MHT CET 2022)

Mht cet अर्ज करण्यासाठी खालील प्रोसेस करा.

१) सर्वप्रथम गूगल क्रोम किंवा कोणतेही वेब ब्राऊझर ओपन करा. त्या सर्च बॉक्स मध्ये https://mhtcet2022.mahacet.org ही वेबसाईट ओपन करा.

२) आता एक नवीन dashboard ओपन झाला त्या मध्ये New Registration या पर्यायावर क्लिक करा.

३) आता या ठिकाणी तुम्हाला  I Accept and Proceed हा पर्याय दिसेल त्या वर क्लिक करा. आणि ok करा.

४) आता तुमची सर्व बेसिक तसेच इतर सर्व आवश्यक ती माहिती भरा आणि सर्व माहिती जतन करा. सर्व माहिती अचूक व व्यवस्थितपणे भरा.

५) तुमचा application number आणि password हा तयार करा.

६) आता तुमचा MHT CET चा अर्ज सबमिट करण्यासाठी mht cet अर्जाची फी ही ऑनलाईन पद्धतीने पे करावी लागेल त्यानंतर तुम्हाला तिथे सबमीट हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.

७) आता सबमिट वर क्लिक केल्या नंतर तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झालेला असेल. तुम्ही आता अर्जाची प्रिंट काढू शकतात.

Mht cet contact details:-

हेल्पलाईन नंबर:-
+91-8975857462, +91-8856860692

ईमेल:-
mhtcet22.cetcell@gmail.com

वेबसाईट:-
http://www.mahacet.org