Covid vaccine certificate असे करा download | कोरोणा लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड

 

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Covid vaccine certificate कसे डाऊनलोड करायचे या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही Covid vaccine घेतलेली असेल. तर तुमच्याकडे कोरोणा लसीकरणाची प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही सरकारी कार्यालय किंवा खाजगी तसेच निमशासकीय संस्था मध्ये प्रवेश करण्यासाठी तसेच पेट्रोल पंप मध्ये सुद्धा  Covid vaccine certificate मागितले जाते. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा.

Covid vaccine certificate असे करा download | कोरोणा लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड

 

आपल्या पैकी सर्वच जणांनी Covid vaccine ही घेतलेली असेल कोरोना लसीकरणाची पहिला किंवा दुसरा डोस नक्की घेतलेला असेल. कारण आता लसीकरण हे सक्तीचे आहे. आपण सर्वांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी Covid vaccine ही घेतलीच पाहिजे.

हे नक्की वाचा:- covid universal Pass अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये फक्त 2 मिनटात

आणि लस घेतल्यानंतर लसीकरणाची प्रमाणपत्र तुमच्या जवळ प्रिंट काढून ठेवा. कारण इथून पुढे प्रत्येक कामासाठी corona vaccination certificate हे तुम्हाला द्यावे लागणार आहे. जर तुम्हाला तुमचे covid vaccine certificate हे मिळत नसेल किंवा ऑनलाईन डाऊनलोड होत नसेल तर तुम्ही १०७५ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार तसेच सूचना देऊ शकतात. त्यानंतर तुमची अडचण सॉल्व करण्यात येईल.covid vaccine certificate download,Covid vaccine certificate download online process.

 

कोविड 1 9 लस प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये pdf मध्ये सेव्ह करून ठेऊ शकतात. आणि गरज पडल्यास दाखवू शकतात. तसेच याची प्रिंट सुद्धा काढू शकतात.

covid-19 vaccine घेण्यासाठी नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्यासाठी तुम्ही https://www.cowin.gov.in या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करू शकतात.covid-19 vaccine registration तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईल नंबर वरून सुद्धा करू शकतात. जर तुम्ही एकाच नंबर वर जास्त लोकांची नोंदणी केली असेल तर त्यांचे पण covid vaccine certificate तुम्हीं तोच मोबाईल नंबर टाकून download करू शकतात.

Covid vaccine certificate कसे download करायचे? :-

covid vaccine certificate download करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करा.

१) सर्व प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Google किंवा गूगल क्रोम ब्राऊझर ओपन करा.
२)आता सर्च बॉक्स मध्ये cowin.gov.in ही वेबसाईट एंटर करा.
३)आता covid पोर्टल हे आपल्या समोर ओपन झाले असेल आता या ठिकाणी Register or sign in yourself हा पर्याय दिसेल त्या पार्यायवर क्लिक करा.
४)तुम्ही लस घेताना नोंदणी केली असेल त्यावेळेस जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर येथे टाका.  आणि otp या पर्यायावर क्लिक करा.
५) आता मोबाईल नंबर वर आलेला otp टाका. आणि ok करा.
६)आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर जेवढ्या लोकांची नोंदणी झालेली असेल त्यांची नावे तुम्हाला दिसत असणार. आता ज्याचे लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करायचे आहे. त्याच्या समोरील certificate या पर्यायावर क्लिक करा.
७) आया certificate वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड झालेले असेल. ते तुम्ही फाईल्स मध्ये डाऊनलोड या पर्यायात जाऊन पाहू शकतात. जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर प्रिंट सुद्धा काढू शकतात.

अश्या पद्धतीने तुम्ही तुमचे लसीकरणाची प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने download करू शकतात.