प्रधानमंत्री पीक विमा योजना च्या अंतर्गत विविध प्रकारची पिकांसाठी विमा योजना राबविण्यात येत असते. पिकांना संरक्षण प्रदान करण्यासाठी हे विमा योजना राबविण्यात येत असते. तुमच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास हा पीक विमा काढून आल्यास तुम्हाला नुकसान भरपाई देण्यात येत असते. म्हणजेच विमा देण्यात येत असतो.
फळपीक विमा योजना अर्ज सुरू, असा करा अर्ज | Fal Pik Vima Yojana 2021-22 |
त्याच पद्धतीने फळ पीक विमा योजना सुद्धा राबविण्यात येत असते. फळ पीक विमा योजना साठी आपल्या महाराष्ट्र राज्यात आंबियाFal Pik Vima Yojana 2021-22 बहरासाठी फळ पीकविमा योजनेसाठी अर्ज हे सुरू झालेले आहे. शेतकरी बांधवांना फळ पीक विमा योजना 2021-2022 साठी नोंदणी करायची आहे. ही फळ पीक विमा योजना नोंदणी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर वर करता येईल.
फळ पिकांचे उत्पन्न तुलनेने इतर पिकांपेक्षा जास्त असते. देशाच्या उत्पन्न मध्ये फळ पिकाचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. जर तुम्हाला फळ पिकातून अपेक्षित उत्पन्न आले नाही तर शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते, त्यामुळे खूप जास्त तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागतो, ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी फळ पीक विमा योजना महत्वाची भूमिका पार पाडते. फळ पीक पिकावणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान पासून होणाऱ्या अनेक प्रकारच्या धोक्यापासून जर शेतकऱ्यांच्या फळ पिकांना सुरक्षित केले आणि त्यांना फळ पीक विमा योजना च्या माध्यमातून विमा संरक्षण दिल्यास नक्कीच आपला शेतकरी समृद्ध बनू शकेल.
या साठी राज्यात प्रधान मंत्री फळ पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. अनेक प्रकारच्या हवामान आधारित शेतकऱ्यांच्या शेती फळ पिकांवर येणाऱ्या धोक्यामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. आणि या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येते. या गोष्टी लक्षात ठेऊन शासनाला शेतकऱ्यांच्या फळ पिकांची जोखीम घेण्यासाठी हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविण्याचे ठरविले आहे.
फळपीक विमा योजना 2021-2022 खालील फळ पिकांचा समावेश:-
या फळ पीक विमा योजना मध्ये आंबिया बहराच्या पीक विमा योजना मध्ये प्रामुख्याने काजू, केळी, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, स्ट्रॉबेरी, पपई, आंबा या फळ पिकांचा समावेश होतो. या योजने मध्ये हवामान धोके या मुळे फळ पिकांना संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. या हवामान धोके मध्ये गारपीट मुळे नुकसान झाल्यास, अती प्रमाणात पाऊस मुळे नुकसान झाल्यास, जास्त तापमान मुळे फळ पिकांना परिणाम झाल्यास, तसेच अवकाळी पाऊस मुळे नुकसान झाल्यास भरपाई तसेच संरक्षण प्रदान करण्यात येते. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक असेल.
या प्रधान मंत्री फळ पीक विमा योजनेत एक शेतकरी चार हेक्टर जमीन पर्यंत चा फळ पीक विमा काढू शकतो. शेतकऱ्याला विम्याची काही रक्कम भरावी लागते. शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या हीस्यावर येणारी रक्कम भरावी लागते. उर्वरित रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या अंतर्गत भरण्यात येते. ‘Fal Pik Vima Yojana 2021’ शेतकऱ्यांनी विमा काढल्या नंतर त्यांना पीक विमा पावती देण्यात येते. त्यावर त्यांचा receipt no असतो. तो शेतकऱ्यांनी जपून ठेवावा. पीक विमा क्लेम करण्यासाठी तो no तुम्हाला पुढे कमी पडणार आहे.
प्रधान मंत्री फळ पीक विमा योजना साठी कागदपत्रे :-
जे शेतकरी बिगर कर्ज दार असतील ज्यांनी कर्ज काढले नसेल अश्या शेतकऱ्यांना सहभाग घ्यायचा असल्यास खालील कागदपत्रे असावी लागते.
शेतकऱ्यांचे आधार कार्ड
जमिनीचा ७/१२
८-अ उतारा
विमा काढत असलेल्या पिकाची लागवड केल्याचे स्वयंघोषणापत्र
फळबागेचा टॅगिंग केलेला फोटो
शेतकऱ्याचे बँक पासबुक
प्रधान मंत्री फळ पीक विमा योजना साठी अर्ज कसा करायचा/नोंदणी प्रक्रिया:-
प्रधान मंत्री फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी म्हणजेच नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या https://pmfby.gov.in जाऊन तुम्हाला फळ पीक विमा नोंदणी करायची आहे. तुम्ही तुमच्या गावांमध्ये जर csc centre असेल तर त्यांच्याकडून अर्ज करून घेऊ शकता. तसेच अनेक महा ई-सेवा केंद्रे(आपले सरकार सेवा केंद्र), बँकांमार्फत(कर्जदार शेतकरी असाल तर) देखील सहभाग नोंदवता येईल. अर्ज हा दिलेल्या मुदतीत करावा लागेल. अर्ज केल्या नंतर तुमच्या मोबाईल वर confirmation मेसेज मिळेल. तसेच विमा पावती सुद्धा मिळते.
पीक विमा भरल्या नंतर नुकसान झाल्यास पीक विमा क्लेम कसा करावा:-
जर पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याचे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्यास 48 तासाच्या आत पीक विमा क्लेम करावा लागतो. त्या नंतर तुम्हाला एक docket id दिला जातो त्यानंतर तुमच्या शेतात पाहणी केली जाते व नुकसान भरपाई दिली जाते. कधी कधी शासनाच्या आणेवारी नुसार भरपाई दिली जाते.
http://www.krishi.maharashtra.gov.in हे कृषी विभाग महाराष्ट्र यांचे official वेबसाईट आहे. या मध्ये तुम्हाला पीक विमा साठी असलेल्या विमा कंपन्या व जिल्हे, कोणत्या जिल्हा साठी कोणती विमा कंपनी आहे, तसेच कंपनीचे कर्मचारी जसे तालुका प्रतिनिधीं यांची नावे व तालुका प्रतिनिधी यांचा फोन नंबर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
तुम्ही तुमच्या पीक विमा पावती वर असलेल्या फोन नंबर वर call करून पीक विमा नुकसानीची माहिती देऊ शकतात किंवा crop insurance हे मोबाईल app download करून त्या मधून करू शकतात. Fal Pik Vima Yojana Maharashtra Online Form
जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करा. आणि हा लेख शेअर करा.