शरद पवार ग्राम समृध्दी योजना महाराष्ट्र

शरद पवार ग्राम समृध्दी योजना महाराष्ट्र 2022   शरद पवार ग्राम समृध्दी योजना  महाराष्ट्र सरकार सुरू करणार आहे.  विद्यमान महा विकास आघाडी सरकार  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर असलेली ही ग्रामीण समृद्धी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.  शरद पवार ग्राम समृद्धी योजनेस राज्य मंत्रिमंडळ मंजुरी देईल.  ही नवीन योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि महाराष्ट्र राज्य कर्मचारी हमी योजनेचे संयोजन असेल. ही योजना सुरुवातीला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून चालवण्यात येत होती त्याच योजनेचे नाव बदलवून शरद पवार ग्राम समृद्धी योजना असे ठेवून एक नवीन सरकारी योजना महाराष्ट्र सरकार ने आणली आहे. खेड्यांच्या विकासास महत्वपूर्ण अशी ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना ठरणार आहे.

 

 

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमुख माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही योजना राज्य सरकार. महाराष्ट्रातील शरद पवार ग्राम समृध्दी योजना सुरू होईल. पवार हे 80 वर्षांचे होतील आणि त्यांच्या सन्मानार्थ सरकार. ही ग्रामीण समृद्धी योजना सुरू करेल. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी रोजगार हमी विभाग नोडल विभाग असेल.

 

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची उद्दीष्टे:Objectives of Sharad Pawar Gram Samrudhi Yojana

 

शरद पवार यांच्या नावाने नव्याने प्रस्तावित महत्वाकांक्षी योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कायापालट करून लोकांचे सबलीकरण करणे हे आहे.  या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शेळी पालन कुकुटपालन व नाडेप कंपोस्ट साठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे यामध्ये. वैयक्तिक लाभाच्या योजना आहे. या शरद पवार ग्राम समृद्धी योजना मध्ये वैयक्तिक लाभाच्या चार योजनांचा समावेश आहे.

राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागाचा विकास करणे ही योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून  राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागाचा विकास करणे ही योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.  या  योजनेच्या माध्यमातून उत्पन्न वाढेल आणि गावाची अर्थव्यवस्था सुधारेल. महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृध्दी योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकरी स्वावलंबी होईल व त्यांना रोजगारही मिळेल. सर्व पात्र शेतकरी या शरद पवाार ग्रामसमृद्धी योजना द्वारेे सक्षम केले जातील.

१) गाय व महेश करता गोठा बांधने

२) शेळीपालनासाठी शेड

३) कुकुट पालनासाठी शेड

४) भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग

त्याचबरोबर जमिनीची पोत सुधारण्यासही मदत होणार आहे

 

या योजनेअंतर्गत ४ योजनांचा समावेश आहे

 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना महाराष्ट्र sharad pawar gram samrudhhi yojana, Sharad Pawar Yojana
शरद पवार ग्राम समृध्दी योजना महाराष्ट्र  202w

 

 

गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे: 

सामान्यतः आपल्याकडे जनावरांसाठी असलेली गोठ्यांची जागा ही ओबडधोबड असते तसेच व ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होऊ शकते आणि शरीराच्या खालच्या बाजूस जखमा होतात. याठिकाणी मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. त्यामुळे या ठिकाणी जनावरांना चारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाकी बांधण्यात येणार आहे. आणि या योजनेसाठी स्वत:ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असणार आहे.एका गोठ्यासाठी साधारणतः ७७ हजार १८८ रुपये खर्च येईल. आणि या साठी ६ गुरांची पूर्वी असलेली तरतूद रद्द करून आता २ गुरे ते ६ गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील. म्हणजे अनुदान हे गुरांच्या संख्येवर अवलंबून आहे

 

 

 

शेळीपालन शेड बांधणे: 

शेळ्यां व मेढ्यांकरिता शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य चांगले राहणार असून त्यांचे वाया जाणारे मल, मूत्र शेतीमध्ये वापरता येते उत्कृष्ट सेंद्रीय खत म्हणून वापरले जाऊ शकेल. ग्रामीण भागामध्ये शेळी ही गरिबांची गाय समजली जाते. एखाद्या गरीब शेतकऱ्याला किंवा शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमीहिन शेतकऱ्याला स्वत:च्या पैशातून १० शेळ्या विकत घेणे देखील शक्य होत नाही. या योजनेत सुरुवातीला १० शेळ्यांचा गट हा शासनाच्या असलेल्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, परंतु कमी शेळ्या असतील तर शेत मजुराला त्याचा फायदा होत नाही. ही गोष्ट लक्षात घेता किमान २ शेळ्या असलेल्या भूमीहिन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेला लाभ आता देण्यात येणार आहे. एका शेडसाठी सुमारे ४९ हजार २८४ रुपये इतका खर्च येतो. एका कुटुंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पट अनुदान मंजुर करण्यात येईल. शेळ्यांच्या संख्येवरून यांच्या आधारावर अनुदान ठरणार आहे

 

 

कुक्कुटपालन शेड बांधणे:

ग्रामीण भागात कुकुट पालन केल्यामुळे कुटुंबांना पूरक उत्पादन मिळते व त्याच बरोबर प्राणिजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो. मात्र, निवारा चांगला नसल्याने जर कुक्कुटपक्षांचे आरोग्य नेहमीच खालावलेले आपल्याला दिसून येते. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांचे, पिल्लांचे आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते. त्यामुळे कुकुट पालन करिता शेड साठी अनुदान देण्यात येते. प्रत्येक शेडला ४९ हजार ७६० रुपये खर्च अपेक्षित आहे. आणि यासाठी कमीत कमी १०० पक्षी सांभाळणे आवश्यक आहे १०० पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या १५०च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

 

 

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग: 

 

Sharad Pawar Gram samruddhi yojana maharashtra प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्यात येत असते त्यामुळे शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्धारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. व शेतकरी समृद्ध बनेल सेंद्रिय पदार्थात सूक्ष्म जीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. याकरिता शेतात उच्च प्रतीचे खत तयार होऊन एक नाडेप बांधण्यासाठी ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. २ ते ३ महिन्या च्या काळात काळपट तपकीरी भूसभुशीत, मऊ, दुर्गंधी विरहित कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च अपेक्षित आहे. आणि इतका निधी अनुदान म्हणून देण्यात येईल.sharad pawar Yojana

 

तर मित्रांनो अशा वैयक्तिक लाभाच्या चार योजनांचा समावेश हा शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 महाराष्ट्र मध्ये करण्यात आलेला आहे. ह्या सर्व योजना ग्राम पातळीवर राबवण्यात येत आहे. आणि आता या योजनांचे अर्ज सुद्धा मागविण्यात येत आहेत. अर्ज हे तुम्हाला ग्राम पंचायत ला करायचे आहेत.

 

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा

 

 

 

या योजनेचे अर्ज भरणे सुरू झाले आहेत खालील लिंक वर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करून घ्या व तुमच्या ग्राम पंचायत मध्ये जमा करा.

 

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे, ज्या योजने अंतर्गत लाभार्थी यांना वैयक्तिक लाभाच्या 4 योजनांचा लाभ देण्यात येत आहे. ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील गरीब लोकांना जीवनदान देणारी महत्वपूर्ण अशी योजना ठरणार आहे. त्यामुळे या योजने अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे ही विनंती.

 

अधिक वाचा :-  पी एम किसान सन्मान निधीच्या सूचीमध्ये नाव  ऑनलाइन पाहण्याची पद्धत 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज डाऊनलोड करा

या योजनेचा GR डाऊनलोड करा

 

Leave a Comment