राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंतचे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामुळे राज्यांमध्ये झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे,आदेशानुसार शेतकऱ्यांच्या शेती पिकाची तातडीने पंचनामे करण्यात यावे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पंचनामे करून तातडीने सादर करण्यात येणार आहे.
घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये शेतकऱ्यांची अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे व अशा परिस्थितीमध्ये दोन हेक्टर मर्यादे ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा ठेवून मदत करण्यात येणार आहे, त्यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले बाधित क्षेत्र त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत थोड्या प्रमाणात मिळू शकते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुढील निर्णय
- राज्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा अभियान, शाळांचे मूल्यांकन करणारा, पहिल्या टप्यात 478 शाळा.
- मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ साठी शासन हमी वाढविली
- औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित सेवानिवृत्ती वेतन
- झोपडपट्टी पुनर्वसन सदनीका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा
- राहता,कोपरगाव येथील शेती महामंडळाची जमीन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी
- महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 राबवून महसुली उत्पादनात मोठी वाढ करणार
- खंडकरी शेतकऱ्यांना भोगवट वर्ग 1 जमिनीसाठी अभियानात सुधारणा
- अशा प्रकारचे राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू, शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ