राज्यातील शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, राज्यामध्ये रब्बी हंगामाच्या कृषी सेवा केंद्रातील बियाणे,खाते खरेदीला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे, परंतु आतापर्यंत रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या कृषी सेवा केंद्रातील वस्तूंची खरेदी न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरच खरेदी करावी कारण दोन नोव्हेंबर पासून कृषी सेवा केंद्र राज्यातील बंद राहणार आहे.
राज्य सरकारच्या कृषी कायदा विधेयक क्र 40,41,42,43 व 44 मधील जाचक अटी शेतकऱ्यांना मान्य नाहीत त्यामुळे या अटींचा विरोध म्हणून तसेच या अटी रद्द करण्यात यावा या उद्देशाने दोन नोव्हेंबर पासून राज्यातील कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
कृषी मंत्री तसेच इतरांना सुद्धा महाराष्ट्र फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन अंतर्गत निवेदन देण्यात आलेली होते, त्यामध्ये सांगण्यात आलेले होते की या अटींमुळे शेतकऱ्यांचे किती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते परंतु यावर हवा तसा तोडगा काढण्यात आलेला नाही.
राज्यामध्ये 2,3 ते 4 नोव्हेंबर या दिवसांमध्ये राज्यातील कृषी सेवा केंद्र बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे, त्यामुळे वरील तारखे दरम्यान राज्यातील कृषी सेवा केंद्र बंद राहतील व त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी याबाबत खबरदारी घ्यावी.
पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडे हे पैसे वापस न केल्यास कारवाई