जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत च्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी पहा ऑनलाईन मित्रांनो आपण आजच्या या लेखामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत च्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहण्याची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत.
हि यादी पाहायला तुम्हाला पंचायत समिती मध्ये किंवा ग्रामपंचायती मध्ये जाण्याची गरज नाही , तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती यादी पाहू शकता अगदी तुमच्या मोबाईल वरून सुद्धा.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत च्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी पहा ऑनलाईन |
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत च्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी पहा ऑनलाईन सर्व प्रथम खालील नरेगाची वेबसाइट ओपन करा. किंवा Google च्या search बॉक्स मध्ये manrega हे type करून search करा. हे तुम्ही मोबाईल मध्ये क्रोम ब्राउजर मध्ये हि करू शकता. किंवा कोणत्या ही browser मध्ये ओपन करू शकता.
https://nrega.nic.in/netnrega/home.aspx
वेबसाइटओपन केल्यानंतर Panchayats(GP/PS/ZP) या ऑपशन वर क्लिक करा.
आता तुम्हाला खालील Panchayats options दिसतील त्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती किंव्हा जिल्हा पंचायत वर क्लिक करून त्यांच्या योजना पहा. जी पाहिजे ती निवडा
१)जिल्हा पंचायत (Zilla Panchayat):-
जर तुम्हाला जील्हा पंचायत ची माहिती पाहिजे असेल तर जिल्हा पंचायत या पर्यायावर जर क्लिक केलात तर खालील पर्याय दिसतील, त्यामध्ये Generate Reports हा पर्याय निवडा.
१)डेटा एंट्री – नवीन कामे, मस्टर रोल, यूसी(Data Entry – New works, Muster Roll, UC)
२)अहवाल तयार करा – एमएसआर रजिस्टर, प्रलंबित कामे, यूसी(Generate Reports – MSR Register, Pending Works, UC)
२)ब्लॉक पंचायत (Block Panchayat):
जर तुम्हाला ब्लॉक पंचायत समिती ची माहिती पहायची असल्यास ब्लॉक पंचायत या पर्यायावर जर क्लिक केलात तर खालील विविध पर्याय दिसतील, त्यामध्ये Generate Reports हा पर्याय निवडा.
१)डेटा एंट्री – नवीन कामे, मस्टर रोल, यूसी(Data Entry – New works , Muster Roll , UC)
२)अकाउंटंटद्वारे एफटीओ निर्मिती(Generation of FTO by Accountant)
३)संयुक्त पीओद्वारे एफटीओ मंजूर करा आणि बँकेत पाठवा(Approve and send FTO to Bank by Joint PO)
४)अहवाल तयार करा – एमएसआर रजिस्टर, प्रलंबित कामे, यूसी(Generate Reports – MSR Register ,Pending Works, UC)
३)ग्रामपंचायत (Gram Panchayat):
जर तुम्हाला ग्राम पंचायत मार्फत राबवलेल्या सर्व योजना व लाभार्थी यादी पहायची असेल तर ग्रामपंचायत या पर्यायावर जर क्लिक केलात तर खालील विविध पर्याय दिसतील, त्यामध्ये Generate Reports हा पर्याय निवडा.
१)डेटा एंट्री – नोंदणी, कामाचे वाटप, नवीन कामे, मस्टर रोल, यूसी(Data Entry – Registration,Work allotment, New works , Muster Roll , UC)
२)अहवाल व्युत्पन्न करा – जॉब कार्ड, जॉब स्लिप, एमएसआर रजिस्टर, प्रलंबित कामे, यूसी(Generate Reports – Job Card, Job Slip , MSR Register , Pending Works, UC)
३)पंचायत विकास अधिकारी / पंचायत सचिव यांनी वेजलिस्ट अधिकृत करा(Authorize WageList By Panchayat Development Officer/Panchayat Secretary)
४)ग्राम प्रधान / अध्यक्षांद्वारे बँक / पोस्ट ऑफिसला वेजलिस्ट पाठवा(Send WageList To Bank/PostOffice By Gram Pradhan)
त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे.आपल्या राज्याच्या नावावर क्लिक करा.
राज्य निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी पाहिजे ते वर्ष निवडा, नंतर तुमचा जिल्हा, तालुका व गावाचे नाव निवडायचे आहे तेथे तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यामध्ये ज्या योजनेची माहिती पाहिजे त्यावर क्लिक करा.
ही सर्व माहिती भरल्या नंतर तुम्हाला list of work या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर ज्या योजनांची लाभार्थी यादी पहायची आहे ती दिसेल.
हे सुध्दा वाचा: कृषी यांत्रिकीकरण योजना
हे सुध्दा वाचा: नवीन विहीर योजना
जिल्हा परिषद पंचायत समिती नागरिकांसाठी विविध प्रकारच्या शासकीय कल्याणकारी योजना राबवित असते. जिल्हा परिषद योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करावयाची असते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्हा परिषद योजना राबविण्यात येत असतात. जिल्हा परिषद योजना अंतर्गत लाभ मिळण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये भेट देऊन संबंधित ऑफलाईन अर्ज प्राप्त करून तो सबमिट करावयाचा आहे त्यानंतर तुम्हाला लाभ मिळेल.
अशाप्रकारे आपण आपल्या गावातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मधील लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची यादी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो. ही माहिती आवडल्यास सर्वांना शेअर करा. त्याचप्रमाणे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत चला. त्याचप्रमाणे या पोस्टच्या खाली आम्ही आमच्या टेलिग्राम चैनल ची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम नावाच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चैनल जॉईन होऊ शकतात.