आजच्या या लेखामध्ये आपण वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान देण्यात येत आलेली योजना शेवगा लागवड अनुदान योजना महाराष्ट्र 2022 विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरु झालेली आहे. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान देण्यात येत आहेत. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेवगा लागवड अनुदान योजना महाराष्ट्र | Shevga lagvad anudan yojana 2022 maharashtra |
Shevga lagvad anudan yojana 2022 करिता शेतकरी बांधवांनी तसेच पशुपालकांनी अर्ज करायचे आहे. या Shevga lagvad anudan yojana अंतर्गत शेतकऱ्यांना शेवगा लागवड करण्यासाठी 30 हजार रुपये प्रती लाभार्थी इतके अनुदान हे देण्यात येत आहे.
हे नक्की वाचा:- प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना
या शेवगा लागवड अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी, पशुपालकांना वैरणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी ३० हजार रुपये प्रती लाभार्थी इतके अनुदान हे मिळणे सुरू झाले आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Shevga lagvad anudan yojana 2022 maharashtra अंतर्गत लाभार्थ्यांना 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) प्रती हेक्टरी व बियाणांची किंमत रु. 6 हजार 750 आणि उर्वरित अनुदान ची रक्कम ही रु. 23 हजार 250 हे एकूण वाटप करण्यात येईल.
हे सुद्धा वाचा:- शेतीसाठी कृषी ड्रोन खरेदी अनुदान योजना
या शेवगा लागवड अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लागवड करण्यासाठी बियाणे हे थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि अनुदानाची उर्वरित रक्कम ही देण्यात येणार आहेत. त्या अनुदानाच्या रकमेतून लाभार्थ्यांना जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करायचा आहे. Maharashtra yojna 2022, maharashtra farmer’s scheme
शेवगा लागवड अनुदान योजना अर्ज प्रक्रिया:-
ज्या शेतकरी बांधवांना शेवगा लागवड अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभ घ्यायचा असेल त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा त्यानंतर पुढील प्रक्रिया त्यांच्या सूचनेनुसार करावी