महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांकरिता अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या राबविण्यात येत असतात. खास करून महिलांकरिता शासन अनेक योजना राबवित आहे. ज्या महिला शेती करतात त्यांच्याकरिता शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महिला किसान योजना (Mahila Kisan Yojana) संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. यामध्ये महिला किसान योजना काय आहे? महिला किसान योजनेचे स्वरूप व महिला किसान योजने अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही माहिती आता आपण जाणून घेत आहोत.
महिला किसान योजना माहिती, अर्ज प्रक्रिया, अनुदान | Mahila Kisan Yojana 2022 Maharashtra |
महिला किसान योजना Mahila Kisan Yojana Maharashtra
केंद्र शासनाच्या वतीने शेतकरी महिलांना 50 हजार रुपये अनुदान देणारी महिला किसान योजना(Mahila kisan Yojana 2022) ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. महिलांचा आर्थिक विकास व्हावा त्याचप्रमाणे महिलांना लागणाऱ्या शेती खर्चा करिता कर्ज उपलब्ध व्हावे या अनुषंगाने केंद्र शासन ही योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ अंतर्गत राबवित आहे. या योजनेअंतर्गत मिळालेले अनुदान आणि कर्ज हे महिलांना फक्त शेती खर्चा करिता वापरता येते. महिला किसान योजनेअंतर्गत 50 हजार रुपये अनुदानामध्ये 10 हजार रुपये अनुदान तर उर्वरित 40 हजार रुपये हे महिलांना 50 टक्के व्याज दराने कर्ज म्हणून देण्यात येते. Shetkari Yojana Maharashtra, Shetkari Yojana 2022 Maharashtra
महिला किसान योजने अंतर्गत कोणत्या महिलांना लाभ देण्यात येत असतो?
शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महिला किसान योजना(Mahila Shetkari Yojana Maharashtra) अंतर्गत अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो. अनुसूचित जातीमध्ये चर्मकार, ढोर, होलार मोची इत्यादी प्रकारच्या उपजात प्रवर्गातील महिलांना लाभ देण्यात येतो. Mahila Shetkari Yojana
महिला किसान योजना अंतर्गत अनुदान किती? How much subsidy under Mahila Kisan Yojana?
महिला किसान योजना अंतर्गत शेतकरी महिलांना 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.
महिला किसान योजनेचा उद्देश? Purpose of Mahila Kisan Yojana?
महिला किसान योजनेचा उद्देश हा अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी महिलांना त्यांचे समाजामध्ये स्थान वाढावे त्यांचे जीवनमान असावे त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
महिला किसान योजना अटी व पात्रता Mahila kisan yojana
1. महिला किसान योजनेअंतर्गत फक्त अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिलांनाच लाभ देण्यात येतो.
2. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे.
3. महिला किसान योजना अंतर्गत ग्रामीण भागाकरिता 98 हजार रुपये उत्पन्न मर्यादा तसेच शहरी भागाकरिता 1 लाख 20 हजार रुपये असणे आवश्यक आहे.
4. महिला किसान योजनेअंतर्गत अर्जदार महिला जो व्यवसाय करत आहे, त्या व्यवसायाचे ज्ञान त्या महिलेस असायला पाहिजे.
5. वयोमर्यादा ही 18 ते 50 वर्ष आहे.
6. अर्जदाराकडे जातीचा दाखला पाहिजे.
7. अर्जदार महिलांनी यापूर्वी या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या नसावा.
वरील प्रमाणे अटी व पात्रता महिला किसान योजना अंतर्गत आहेत.
महिला किसान योजना लाभाचे स्वरूप
शासनाच्या वतीने शेतकरी महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या महिला किसान योजना (Mahila Kisan Yojana Maharashtra)अंतर्गत लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. महिलांना देण्यात येणाऱ्या पन्नास हजाराच्या मदतीमध्ये 10 हजार रुपये अनुदान असते तर 40 हजार रुपये हे महिलांना 5 टक्के व्याज दराने कर्ज दिले जाते. ज्या महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावयाचा असेल त्या महिलेच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे. जर शेती तिच्या आणि तिच्या पतीच्या दोघांच्या नावावर असेल तरीसुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळतो.
जर महिलेच्या नावावर जमीन नसेल आणि तिच्या पतीच्या नावावर असेल तर तिच्या पतीचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागतील. या योजने अंतर्गत मिळालेले कर्ज हे फक्त शेती व्यवसायाकरिता दिले जाते. महिला किसान योजने (Mahila Shetkari Yojana) अंतर्गत शेतकरी महिलांना कर्ज मिळाल्यामुळे त्यांना शेतीतील खर्चा करता पैशाची उपलब्धता भासल्यास ते या कर्जाचा उपयोग करून चांगल्या प्रकारे शेती करू शकतात. जेणेकरून त्यांच्या शेती उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ दिसेल.
हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे कुणाला मिळणार?
महिला किसान योजना अर्ज प्रक्रिया Mahila Kisan Yojana Application Process
महिला किसान योजना(Mahila Shetkari Yojana) अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने असून ज्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छित आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयात जाऊन हा अर्ज मिळवायचा आहे. रोहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थितपणे भरायचा आहे त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो अर्ज जमा करायचा आहे. जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात हा अर्ज करायचा आहे.