रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, शासनाच्या माध्यमातून एक मोहीम राबवली जाणार असून या मोहिमेच्या माध्यमातून जे रेशन कार्डधारक अटीत पात्र नसून सुद्धा योजनेचा लाभ घेत आहे, तसेच या रेशन कार्ड धारक नागरिकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे अशा अनेक अटींमध्ये पात्र नसून सुद्धा त्यांच्या माध्यमातून जर रेशन कार्ड धान्याचा लाभ घेत असतील तर अशा नागरिकांना आता लगेचच योजनेमधून बाद केले जाणार आहे.
कोणतीही योजना राबवायची झाल्यास त्यामध्ये काही अटी व शर्ती या दिलेले असतात त्याचप्रमाणे रेशन कार्ड धार धारक नागरिकांच्या लाभासाठी सुद्धा काही अटी नेमून देण्यात आलेले आहे त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे रेशन कार्ड धारक नागरिकांचे वार्षिक उत्पन्न. जर वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल तर त्यांना अर्थातच लाभ घेता येईल परंतु ज्या नागरिकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल, परंतु ते नागरिक सुद्धा या रेशन धान्याचा लाभ घेत असतील अशांची छाननी पुढे केली जाईल व अशा नागरिकांना योजनेमधून बाद केले जाणार आहे.
खालील काही कारणांमुळे रेशन कार्ड धारक होणार योजनेतून बाद
- जे नागरिक नोकरीवर असतील तसेच शासकीय निम शासकीय अशा ठिकाणी कार्यरत असणारे नागरिक अपात्र ठरतील.
- यामध्ये मुख्य बाब म्हणजे अशा शासकीय व निमशासकीय ठिकाणी काम करणाऱ्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न अर्थातच एक लाखापेक्षा जास्त असेल त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- त्याच पद्धतीने रेशन कार्ड मध्ये केशरी व पिवळे रेशन कार्ड धारक नागरिक धान्याचा लाभ घेतात त्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे जास्त जमीन असून जास्त वार्षिक उत्पन्न आहे,
- अशा सर्व बाबींचा विचार करून 4 एप्रिल 2025 रोजी शासनाच्या माध्यमातून जीआर निर्गमित करण्यात आलेला असून या जीआर नुसार पुढे योग्य पद्धतीने रेशन कार्डधारक नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
देशामध्ये मागे एक मोहीम राबवली गेलेली होती, त्यामध्ये केशरी रेशन कार्ड धारक नागरिकांचे रेशन बंद करून त्यांना मासिक पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, व त्यानुसार अनेक नागरिकांना पैशाची वितरण सुद्धा चालू झालेले आहे परंतु या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना अजूनही धान्य मिळणे चालू आहे तसेच त्यामध्ये निराधार अनेक शिधापत्रिकाधारक योजनेच्या माध्यमातून लाभ घेतात परंतु यामध्येही काही नागरिक अपात्र असून सुद्धा लाभ घेत असल्याने शासनाच्या माध्यमातून याची छाननी केली जाणार आहे.