देशामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना चालू करण्यात आलेली असून, या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या व्यवसायिकांना व्यवसाय चालू करण्यासाठी जे कर्ज उपलब्ध करून दिले जाते, त्याचप्रमाणे ज्या नागरिकांनी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण केलेले असतील अशांना कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे, सुरुवातीला कर्ज वाटपाची रक्कम ही एक लाख असून पुढील टप्प्यांमध्ये कर्ज वाटपाची रक्कम दोन लाख होईल. त्या योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असल्यास नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया भरणे आवश्यक आहे.
आतापर्यंत अनेक नागरिकांनी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतलेले आहेत व आपला स्वतःचा योग्य असा व्यवसाय चालू केलेला आहे त्यामुळे तुम्ही जर आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी इच्छुक असाल व तुमच्याकडे सुद्धा भांडवल उपलब्ध नसेल तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही तुम्हाला हातभार लावण्यास मदत करेल, अनेकांना प्रश्न पडतो की योजनेचा लाभ कसा घ्यावा तर हेच माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याची प्रोसेस
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यासाठी सीएससी सेंटर वर जाऊन त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
- त्यानंतर तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमार्फत तो अर्ज पुढे पाठवला जाईल त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल.
- प्रशिक्षण साधारणतः पंधरा दिवसाचे असणार आहे, प्रशिक्षणा दरम्यान 500 रुपये एवढा रोज सुद्धा प्रशिक्षणार्थ्याला मिळणार आहे.
- व अशाच प्रकारचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेले असेल अशांना पुढील एक लाख रुपये व नंतर दोन लाख रुपये अशा प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिल्या जाईल.
- ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे त्यांना कर्जाचे वितरण होणार आहे, अर्ज भरत असताना कोणत्या कामासाठी तुम्ही कर्ज घेत आहात त्यामध्ये टाकावे लागेल व त्यानुसारच तुम्हाला त्या कामासाठीचे प्रशिक्षण दिले जाईल.
- ज्या लाभार्थ्यांना विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशांनी https://pmvishwakarma.gov.in/या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
- अशाप्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशांमध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना चालू करून अनेकांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची इच्छा पूर्ण होताना दिसते.
अशाप्रकारे वरील दिलेली संपूर्ण माहिती व प्रत्येक स्टेप नुसार प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची प्रक्रिया पार पाडली जाईल त्यामध्ये सीएससी सेंटरवर जाऊन, नागरिकाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल त्यानंतर वरील प्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेवटी प्रशिक्षणानंतर एक ते दोन लाख रुपये एवढे कर्ज उपलब्ध करून दिली जाईल, व त्या पैशाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आपला स्वतःचा व्यवसाय अगदी सहज चालू करू शकेल.