राज्यातील विविध भागांमध्ये विविध बाजार समितीत आज हरभऱ्याला काय दर मिळाला, तसेच कोणत्या ठिकाणी भावामध्ये स्थिरता तर कोणत्या ठिकाणी चढ किंवा उतार बघायला मिळाला, यावरूनच शेतकरी आपला माल विकायचा की नाही हे ठरवत असतो त्यामुळे आपण विविध बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळालेला दर खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात हरभरा हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते व सध्याच्या स्थितीमध्ये सर्व हरभऱ्याची काढणी झालेली असून अनेक शेतकऱ्यांनी आपला हरभरा मार्केटमध्ये नेऊन विक्री सुद्धा केलेला आहे.
काही शेतकरी हरभऱ्याचे दर अजूनही वाढतील याच्या प्रतिक्षेमध्ये असून त्यांची प्रतीक्षा फोल ठरणार की खरंच त्यांची प्रतीक्षा योग्य ठरणार हे सुद्धा बघण्यासारखे आहे, कारण मागील तीन-चार आठवड्यांचा विचार करायचा झाल्यास हरभऱ्याचे दर स्थिर होते परंतु मागील काही दिवसांमधून हरभऱ्याच्या दरामध्ये चढ बघायला मिळालेली होती व आता सध्याच्या स्थितीमध्ये हरभऱ्याचे दर कुठे स्थिर तर कुठे चढउतार होताना दिसत आहेत.
विविध ठिकाणचे हरभरा दर
अमरावती या ठिकाणी हरभऱ्याला मिळालेला दर हा सरासरी 5625 रुपये होता, तर कमीत कमी दर 5500 रुपये एवढा होता, जास्तीत जास्त 5750 रुपये पर्यंत हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. नागपूर या ठिकाणच्या बाजार समिती यांचा विचार करायचा झाल्यास या ठिकाणी हरभऱ्याला मिळालेला सरासरी दर 5731 रुपये एवढा होता तर कमीत कमी व जास्तीत जास्त दर 5500 ते 5808 रूपया एवढा बघायला मिळाला. त्याचप्रमाणे नागपूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याची असलेली आवक 1300 क्विंटल एवढी होती.
राज्यातील विविध बाजार समितींचा विचार करायचा असल्यास सरासरी दर काही ठिकाणी 5530 ते 5850 रुपयापर्यंत होता, तर दुधनी या ठिकाणी पाच हजार सहाशे पन्नास रुपये एवढा सरासरी दर होता, 5200 रुपये एवढा सरासरी धुळे या ठिकाणी बघायला मिळाला, अशाप्रकारे राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील 5500 ते 5600 रुपये दरम्यान हरभऱ्याचा सरासरी जर बघायला मिळतो आहे यावरून शेतकऱ्यांनी आपल्या हरभऱ्याची विक्री करावी की नाही हे ठरवावे.
कर्ज मिळण्यास सुरुवात, आधी मिळेल 1 लाख नंतर मिळेल 2 लाख रु, जाणून घ्या कोणती आहे योजना