शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत शेतीसाठी गाळ, माती व मुरुम मिळणार, जाणून घ्या प्रोसेस | Gal Mati Murum Yojana

शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक शेतकरी तसेच मजूर वर्ग यांच्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, त्यामध्ये विहीर बांधकाम योजना तसेच घरकुल योजना अशा विविध योजनांचा समावेश होतो, त्याच पद्धतीने शासनाच्या माध्यमातून आता ज्यांना काही कारणास्तव घरकुल मिळाल्यानंतर आपल्या घरामध्ये भर भरण्यासाठी लागणारा मुरूम किंवा विहीर बांधकामानंतर विहिरीच्या कड्या भरण्यासाठी हवा असलेला मुरूम किंवा माती ही मोफत दिली जाणार आहे, अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली असून त्यामध्ये नेमके काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

शासनाच्या जीआर ची संपूर्ण माहिती

 

अनेक वेळा शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो अशावेळी मोठ्या प्रमाणात मुरमाची आवश्यकता असते परंतु तो मुरूम विकत आणणे अत्यंत कठीण होऊन बसते त्यामुळे शासनाच्या माध्यमातून 3 एप्रिल 2025 रोजी जीआर काढण्यात आलेला असून त्यामध्ये काही नागरिकांना म्हणजेच ठराविक लाभार्थ्यांना मुरूम व माती ही मोफत पुरवली जाईल, त्यामध्ये काही योजनांचा समावेश असेल, त्यात जर तुम्ही पात्र ठरत असाल व तुम्हाला जर मुरूम किंवा मातीची आवश्यकता असेल तर तुम्हाला सुद्धा मुरूम व माती शासनाच्या माध्यमातून मोफत मिळवता येईल.

 

या योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार मोफत मुरूम व माती

 

अनेकांना प्रश्न पडलेला असेल की शासनाच्या माध्यमातून ही मोफत मुरूम व माती देण्याची स्कीम अर्थातच सर्वांसाठी नसेल? तर होय, या संबंधित निघालेल्या जीआर नुसार मोफत मुरूम व माती त्याच लाभार्थ्यांना मिळणार ज्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांच्या घरामध्ये भरण्यासाठी किंवा इतर कारणास्तव मुरुमाची आवश्यकता असेल तर त्यांना मोफत मुरूम दिला जाईल व त्याच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विहिरीची योजना घेतलेली आहे व त्यांचे विहिरीचे बांधकाम झालेले असून त्यांना विहिरीच्या कड्या करण्यासाठी मुरमाची, मातीची आवश्यकता असल्यास असे लाभार्थी सुद्धा या मार्फत मोफत मुरूम व माती मिळवू शकतील.

सविस्तर शासन निर्णय पहा

अशाप्रकारे शासनाच्या माध्यमातून नवीन जीआर काढण्यात आलेला असून, आता घरकुलाच्या लाभार्थ्याला व विहिरीच्या लाभार्थ्यांना इतरत्र कोणत्याही ठिकाणाहून माती किंवा मुरूम विकत आणण्याची आवश्यकता नाही कारण शासनाच्या माध्यमातून याची सुद्धा सोय आता करण्यात आलेली आहे.

 

1 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार बंद, नवीन शासन निर्णय जारी