देशामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांची सुविधा मिळावी त्याच पद्धतीने सर्व प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतीची माहिती आधार कार्ड ला जोडली जावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक तयार करून दिला जात आहे, त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा फार्मर आयडीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला सुद्धा शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळेल, ॲग्री स्टॅक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवून दिल्या जात आहे, त्यामुळे याचे फायदे त्यास पद्धतीने कोणत्या कागदपत्रानुसार शेतकरी फार्मर आयडी तयार करू शकतात हे सुद्धा खालील प्रमाणे जाणून घेऊया.
शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना थेट मिळावा तसेच शेतकऱ्यांची सर्व माहिती एका ठिकाणी फार्मर आयडीच्या द्वारा गोळा व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून फार्मर आयडी दिला जात आहे, त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असावी लागतात ती खालील प्रमाणे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- सातबारा
फार्मर आयडी साठी नोंदणी करण्याची संपूर्ण प्रोसेस
- फार्मर आयडी मिळवण्यासाठी शेतकऱ्याला सीएससी सेंटर किंवा आपले सेवा केंद्र तसेच तहसील कार्यालय अशा विविध ठिकाणाहून फार्मर आयडी साठी नोंदणी करता येते.
- नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ओपन करून त्या ठिकाणी क्रिएट अकाउंट मध्ये जायचे आहे, त्या ठिकाणी आधार केवायसी साठी आधार नंबर एंटर करून मोबाईलवर आलेला ओटीपी एंटर करावा.
- व्हेरिफाइडवर जाऊन त्या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती आधार कार्ड नाव, गाव, पत्ता अशीच दाखवली जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर आयडी साठी जो मोबाईल क्रमांक द्यायचा असेल तो इंटर करावा लागेल.
- त्यानंतर क्रिएट माय अकाउंट मध्ये जाऊन, कन्फर्मेशन मध्ये जाऊन ओके दाबा, त्यानंतर कॅपच्या कोड तसेच माहिती टाकून लॉगिन करा.
- रजिस्टर एज फार्मर वर जाऊन कन्फर्मेशन घेऊन होय किंवा नाही हे पर्याय निवडा, त्यानंतर विचारले गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी लागेल.
- लँड डिटेल मध्ये जाऊन वेरिफाइड ऑल इन्फॉर्मेशन मध्ये जा, त्यानंतर सेव वर क्लिक करा. त्यानंतर प्रोसीड टू साइन वर जावे, संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होऊन फार्मर एनरोलमेंट आयडी दिसेल.
- त्यानंतर पुढे तुमच्या फार्मर आयडीला अप्रू केल्यानंतर फार्मर आयडी येईल अशा प्रकारे तुमची फार्मर आयडीची संपूर्ण प्रोसेस वरील प्रमाणे देण्यात आलेली आहे त्यानुसार प्रत्येक शेतकरी आपला फार्मर आयडी क्रमांक काढू शकणार आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत शेतीसाठी गाळ, माती व मुरुम मिळणार, जाणून घ्या प्रोसेस